Ad will apear here
Next
समीक्षा संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले
पंढरपूरला होणाऱ्या एक दिवसीय संमेलनाचे उद्घाटक प्रा. वसंत डहाके
पुणे : ‘महाराष्ट्र साहित्य परिषदेची (मसाप) पंढरपूर शाखा आणि पंढरपूरचे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने एक डिसेंबर २०१८ रोजी एक दिवसीय समीक्षा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांची निवड करण्यात आली असून, संमेलनाचे उद्घाटन प्रा. वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते होणार आहे,’ अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.

या वेळी स्वागताध्यक्ष आमदार भारतनाना भालके, आमदार दत्तात्रय सावंत, ‘मसाप’चे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, समीक्षा संमेलनाचे निमंत्रक सुरेश देशपांडे, संयोजक कल्याण शिंदे, ‘मसाप’चे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पद्माकर कुलकर्णी, जे. जे. कुलकर्णी,  साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य, स्वेरी कॉलेजचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे, नगराध्यक्षा साधना भोसले, रयत शिक्षण संस्थेचे सदस्य राजूबापू पाटील, उपनगराध्यक्ष विशाल मलपे, प्रशांत शिंदे हे उपस्थित राहणार आहेत.

डॉ. नागनाथ कोत्तापल्लेपहिल्या सत्रात ‘आजची समीक्षा समकालीन साहित्याला न्याय देते का?’ या विषयावर समीक्षक प्राचार्य डॉ. महेंद्र कदम यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या चर्चासत्रात प्रा. डॉ. सुहास पुजारी, प्रा. डॉ. राजशेखर शिंदे आणि प्रा. डॉ. अरुण कुलकर्णी हे आपले विचार व्यक्त करतील. दुपारच्या सत्रात सुनील जवंजाळ व प्रा. डॉ. चांगदेव कांबळे हे जेष्ठ ग्रामीण साहित्यिक व समीक्षक डॉ. द. ता. भोसले यांची मुलाखत घेतील.

प्रा. वसंत आबाजी डहाकेतिसऱ्या सत्रात सोलापूर विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. देविदास गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली खुले निबंध वाचन होणार आहे आणि समारोप सत्र नागनाथ कोत्तापल्ले यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, मनोरमा परिवाराचे अध्यक्ष श्रीकांत मोरे, महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक भोईटे, ‘मसाप’ पुणे शहर प्रतिनिधी शिरीष चिटणीस, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एन. एन. तंटक, प्रा. बी. जे. तोडकरी, डॉ. एस. एस. माने हे उपस्थित राहणार आहेत.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZMCBU
Similar Posts
साहित्यप्रेमींच्या स्वागतासाठी ‘मसाप’ सज्ज पुणे : पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषद ही महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था आहे. गेली ११० वर्षे मराठी भाषा, साहित्य, समीक्षा आणि संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धनासाठी योगदान देणाऱ्या या संस्थेचा १११वा वर्धापनदिन २६ आणि २७ मे रोजी साजरा होणार आहे. २६ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता ग्रंथ आणि
‘मसाप’चा रेखा ढोले पुरस्कार जाहीर पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद (मसाप) पुणे आणि राजहंस प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राजहंस’च्या एक अभिन्न सदस्य आणि राजहंस प्रकाशनाच्या पुस्तक निर्मितीच्या कार्याचा अविभाज्य घटक असलेल्या श्रीमती रेखा ढोले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘मसाप’तर्फे साहित्यक्षेत्रासाठी पुरस्कार दिले जातात. या वर्षी मराठी
‘संगीतामुळे दृष्टी सौंदर्यमयी होते’ पुणे : ‘माणूस सर्व कला शिकतो तेव्हा त्याला सौंदर्यदृष्टी येते; पण संगीत शिकतो तेव्हा दृष्टीच सौंदर्यमयी होते. नाटक हे करणाऱ्याच्या मनात असावे लागते. ते नसेल तर नाटकातील गाणे सुरेल होऊ शकत नाही. कारण, नाटकात गाणे हे सोपे काम नाही. संगीत नाटकातले गद्यही सुरात म्हणावे लागते. सूर असतील तरच नाटक यशस्वी होते,’
डॉ. गाडगीळ सात ऑगस्टला ‘मसाप गप्पा’मध्ये पुणे : आपल्या सोप्या आणि सहजसुंदर शैलीतून विज्ञानविषयक लेखन करणारे प्रसिद्ध लेखक आणि ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘मसाप गप्पा’ या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम सात ऑगस्ट २०१८ रोजी सायंकाळी ६.३० वाजता, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language